ठळक बातम्या

आजपासून पाक-विंडीदरम्यान टी-२० मालिका

* वेस्ट इंडीजच्या तीन खेळाडूंना कोरोना
कराची – न्यूझीलंड आणि इंग्लंडने माघार घेतल्यानंतर वेस्ट इंडीज संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे.यजमान पाकिस्तान आणि विंडीज संघादरम्यान आज सोमवारपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे, पंरतुया मालिकेला सुरू होण्यापूर्वीकोरोनाने पाहुण्या विंडीजच्या संघात शिरकाव केला आहे. वेस्ट इंडीजच्या शेल्डन कॉट्रेल, अष्टपैलू रोसटन चेज आणि कायले मेयर्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुदैवाने उर्वरित खेळाडूंची प्रकृती सुखरूप आहे. त्यामुळे मालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रमुख खेळाडूंची माघार आणि तीन खेळाडूंना कोरोना झाल्यानंतरही वेस्ट इंडीजला कमी लेखणार नाही, असे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने स्पष्ट केले. टी-२० विश्वचषकात पाकिस्ताननेउपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर बांगलादेश दौऱ्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असल्याचेबाबर म्हटले आहे.कोरोना झालेल्या वेस्ट इंडीजच्या खेळाडूविषयी सहानभूती आहे. विलगीकरणात राहणेनेहमीच आव्हानात्मक असते. या परिस्थितीतून आम्ही गेलो आहोत. त्यामुळे काही वेळा नकारात्मक विचारसरणी निर्माण होेते आणि संघाची मोट बांधता येत नाही, याकडे बाबरने लक्ष वेधले.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या वेस्ट इंडीजच्या तीन खेळाडूंना कराची येथे१० दिवस विलगीकरणात राहण्याचेनिर्देश देण्यात आलेआहे. गत चॅम्पियन वेस्टइंडीजला विश्वचषक स्पर्धेत फारसी चांगली कामगिरी करता आली नव्हती .टी-२० विश्वचषकात जायबंदी झाल्यामुळे केरॉन पोलार्डने माघार घेतली आहे. तसेच आंद्रे रस्सेलने दुखापतीचेकारण पुढे करत पाकिस्तान दौऱ्यातून अंग काढून घेतलेआहे. निकोलस पूरन आणि शाई होप अनुक्रमे टी-२० व एकदिवसीय संघाचे नेतृत्व करताना दिसतील.

About Sub-Editor

अवश्य वाचा

सौरव गांगुलींच्या तब्येतीत सुधारणा

कोलकाता – कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करावे लागलेले बीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरभ गांगुलींच्या प्रकृतीत …