बारावी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा (एमएसबीएसएचएसई)मार्फत २०२२मध्ये घेण्यात येणार असलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. बारावीचे परीक्षा अर्ज स्वीकारण्यास १२ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली होती. तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा अर्ज दाखल करण्यास १२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी ६६६.ेंँंँ२२ूुङ्मं१ि.्रल्ल ??????????????????या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ‘सरल’ डेटाबेस प्रणालीवरून नियमित शुल्कासह १२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२१ या कालावधीत भरायची आहेत.
विलंब शुल्कासह हे अर्ज १३ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२१ या कालावधीत भरता येतील. तर, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी १२ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२१ असा आहे. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट सोमवार २७ डिसेंबर, २०२१ रोजी जमा करावयाची आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कळवण्यात आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

३६५ दिवस शिवजयंती साजरी करावी – राज ठाकरे

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करतो. …